
कणकवली:कणकवली- नागवे रोडच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता. आमच्या मागणीमुळेच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये.असा टोला उद्धव ठाकरे गटातील युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे यांनी लगावत सेनेमुळेच हे काम झाले आहे असा दावा देखील केला.
शहरातील कणकवली नागवे स्वयंभू मंदिरकडे जाणा-या रस्त्याच्या दुरुस्तीवरून राजकीय श्रेयवाद रंगू लागला आहे. युवासेनेने या कामावरून दावा केला आहे. याबाबत तेजस राणे यांनी प्रसिद्ध पत्रक दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नागवे रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला होता. वाहनचालक,विद्यार्थी,पादचारी यांना याचा त्रास होत होता.मोठं-मोठे खड्डे पडल्याने या रस्तावरून वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. याबाबतीत शिवसेनाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात कार्यकारी अभियंता श्री शेवाळे यांना निवेदन देण्यात आले होते.हा मार्ग तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार हे काम सुरू झाले आहे. असा दावा श्री राणे यांनी केला.या कामाच इतर पक्षांनी त्याचे श्रेय येऊ नये व आमच्यामुळे हे खड्डे बुजवले असे दाखवू नये .असा सल्ला श्री राणे यांनी दिला. तसेच या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी आम्ही बांधकाम अभियंत्यांची प्रत्यक्षात भेट घेतली. ठेकेदाराने उत्कृष्ट प्रतिचे काम करावे अशी मागणी केली असल्याचे श्री रावराणे यांनी सांगितले. यावेळी कणकवली शहर तर्फ युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, वॉर्ड प्रमुख महेश राणे,वॉर्ड प्रमुख संतोष राणे, अक्षय मेस्त्री, उपशहरप्रमुख जोगेश राणे, यश घाडीगावकर, सत्यवान राणे, कुणाल राणे, हर्षद मेस्त्री व बांधकाम अधिकारी उत्कर्षा तायडे उपस्थित होते