उबाठाला जोरदार धक्का..!

Edited by: भरत केसरकर
Published on: February 08, 2024 06:52 AM
views 8049  views

कुडाळ : सिंधुदुर्गातील उबाठा शिवसेनेला आणखीन एक धक्का बसलाय. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.   

माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, उबाठा युवासेना जिल्हा प्रवक्ते यशवर्धन राणे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदेश सावंत पटेल, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र गावकर यांच्या मार्गदर्शाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. 

उबाठाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, उबाठा शिवसेना प्रवक्ते यशवर्धन राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक  केसरकर, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदेश सावंत पटेल, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा हातात घेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

उबाठाचे युवासेना जिल्हा प्रवक्ते यशवर्धन राणे यांनी मागील १५ दिवसापूर्वी शिवसेना नेते, सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत याची भेट घेतली होती. त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन त्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचं  शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदेश सावंत पटेल, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र गावकर यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले.