
वेंगुर्ला : तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने कडून सध्या जिल्हा परिषद मतदार संघ बांधणी जोरदार सुरु असून यावेळी उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघाच्या विभाग प्रमुख म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ते सुजित चमणकर यांची निवड तर उभादांडा गाव शाखा प्रमुख पदी दयानंद खर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली.
वेंगुर्ला तालुक्यात पक्षात सध्या तालुका निहाय संघटना बदल सुरु असून नव्या युवा कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेत पक्ष संघटना भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. चमणकर यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून युवा कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत असल्याचे यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी सांगितले.
या निवडीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वेंगुर्ला संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर, तालुका प्रमुख यशवंत परब, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, उभादांडा सरपंच निलेश चमणकर यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी विभाग प्रमुख कार्मीस आल्मेडा, उभादांडा ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण पेडणेकर, गणेश चेंदवणकर, देवा जुवलेकर, सिद्धी पेडणेकर, गट प्रमुख राजन चेंदवणकर आदी उपस्थित उपस्थित होते.