उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची उद्या सभा

पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन
Edited by: दीपेश परब
Published on: November 11, 2022 18:30 PM
views 182  views

वेंगुर्ला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मासिक सभा उद्या शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या उपस्थितीत  शिवसेना शाखा, वेंगुर्ला येथे होणार आहे. या सभेमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करून थेट सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. 

तरी वेंगुर्ला तालुक्यातील, शहरातील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी - माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य व लोकप्रतिनिधी यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.