
वेंगुर्ला : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफिक बेग यांची अल्पसंख्यांक वेंगुर्ला तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना अल्पसंख्यांक सेल चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद अब्बास बटवाले यांच्या सहीचे पत्र आज वेंगुर्ला येथे शिवसेनेच्या मासिक सभेचे औचित्य साधून वितरित करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी मतदार संघ प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, प्रकाश गडेकर, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहर प्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, रेडी उपसरपंच नामदेव राणे, रेडी ग्रा. पं सदस्य श्रीकांत राऊळ, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, रश्मी डिचोलकर विनोद राणे, प्रसाद रेडकर तसेच वेंगुर्ला तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.