पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला मंडणगड न्यायालय इमारत कामकामाजा आढावा

Edited by:
Published on: August 25, 2025 10:12 AM
views 64  views

मंडणगड : देशाचे सरन्यायाधीश व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री  यांच्यासह पुर्ण न्यायव्यव्यस्थेची उपस्थितीत मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन सप्टेंबर महिन्यात होणार असल्याने 10 सप्टेंबर 2025 पुर्वी तीन माळ्यांसह इमारतीचे पुर्ण काम करून

इमारत ताब्यात द्या, अशा सुचना जिल्ह्यांचे पालकमंत्री  उदय सामंत यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाला दिल्या . जिल्ह्याधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या मुख्य उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांनी इमारतीचे दोन मजल्यांचे कामकाजाचा , याचबरोबर न्यायालयाचे आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळ्याचे उभारणी कामाचे आढावा घेतला व नगरपंचायत मंडणगड येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, जिल्हा अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, दापोलीचे प्रातांधिकारी विजयकुमार सुर्यवंशी, नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, तहसिलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, शिवसेना जिल्हा प्रुमख शशिकांत चव्हाण, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, बार कौन्सिल मंडणगडचे अध्यक्ष अँड. मिलिंद लोखंडे,  कार्यकारी अभियंता श्री. सुखदेवे आणि संबंधीत खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सात महिन्यांच्या विक्रमी वेळेत 65 हजार चौरस मिटरची सुशीभीत इमारत उभी केल्याबद्दल कामावर समाधान व्यक्त करताना संबंधित विभागाचे अभिनंदन केले. न्यायालयाचा उद्घाटन सोहाळा ऐतिहासीक असल्याने इमारतीबरोबर उद्घाटन सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पुर्व तयाऱ्यांचा त्यांनी यावेळी विस्ताराने आढावा घेतला. याचबरोबर कार्यक्रमासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या निवासाची विशेष व्यवस्था लावण्याची सुचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. इमारतीचे कामकाज सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधांच्या उपलब्धततेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मंडणगड नगरपंचायतीचे इमारतीचे सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधीची घोषणा केली. इमारतीचे सुशीभीकरण व इमारतीमध्ये लिप्ट बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. नगरपंचायतीचे विकास आऱाखड्याची वाट न पाहता शहरात पायाभुत सुविधांचे निर्मीतीकडे अग्रक्रमाने लक्ष द्यावे अशा सुचना करताना रस्ते विकास व सांडपाणी व्यवस्थापन यांच्याकरिता 1 कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा केली. याचबरोबर  अण्णाभाऊ साठे महामंडळातून 50 लाख  रुपयांच्या निधीची घोषणा केली. आंबडवे येथील म़ॉडेल कॉलेज व आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जागतीक दर्जाचे स्मारकांचे निर्मीतीचे कामासंदर्भातील प्रगती व विविध समस्यांचा आढावा घेऊन विविध सुचना यावेळी दिल्या. आढवा सभेस जिल्हा व तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.