
मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या मुळगावी गेल्या तीन वर्षापासून शासनाच्या माध्यमातून सुरु असलेली आंबेडकर जंयत्ती सुरु करण्याचे व त्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे हे पालकमंत्री या नात्याने माझे परम् भाग्य असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आंबडवे येथे केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2025 रोजी आंबडवे येथे शासनाच्या माध्यमातून आयोजीत जंयत्ती सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की बाबासाहेबांनी देशास दिलेल्या संविधानाच्या आधारे आपली लोकशाही जगात समृध्द झाली आहे व संविधानाच्या आधारे आम्ही लोकप्रतिनिधी बनुन सत्तेत वेगवेगळी मंत्रीपदे भुषवित आहोत याची आम्हाला पुर्ण व प्रामाणीक जाणीव आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना तडा देण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना राज्यशासन शासन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बाबासाहेबांचे आंबडवे हे मुळगाव मी पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आंबडवे येथे बाबासाहेबांचे जागतीक दर्जाचे स्मारक उभारणीस कटिबध्द असून त्यादृष्टीने गेल्या एक वर्षापासून स्थानीक आमदारांच्या पुढाकाराने शासन प्रयत्नशील आहे. या संदर्भात यंत्रणेने केलेल्या नियोजनास प्रत्यक्ष रुप आणण्यासाठी राज्यशासन लवकर भरघोस निधी जाहीर करणार आहे. आंबडवे येथे बाबासाहेबांचे जागतीक दर्जाचे स्मारक व्हावे ते केवळ वास्तु पुरते मर्यादीत न राहता विचारांचे स्मारक बनावे, ज्ञान मंदिर बनावे याकरिता नियोजन असून त्यामुळे येथे येणारे अभ्यासक, पर्यटक व अनुयाई विचारांची प्रेरणा घेऊन पुढे जातील असा विश्वास व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस विभागाचे मदतीने अंमली पदार्थ विरोधी मोहीम यशस्वीपणे राबवून राज्यातील पहीला अंमली पदार्थ मुक्त रत्नागिरी जिल्हा होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमास गृहराज्यमंत्री योगेश कदम, तहसिलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, समाजकल्याण सहाय्यक आय़ुक्त दीपक घाटे, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार माजी सभापती अण्णा कदम, नगरसेवक आदेश मर्चंडे, लेखक जगदीश ओहोळे, सुदर्शन सकपाळ, प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, मुश्ताक दाभिळकर, सरपंच सौ. दिपीका जाखळ, प्रमोद धोत्रे सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी कर्मचारी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष महेंद्र सकपाळ यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र सकपाळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने मान्यवरांच्या हस्ते जगदिश ओहोळे यांच्या जग बदलणारा माणुस या पुस्तकाचे हिंदी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. याचबरोबर समाजकल्याण विभागाचेवतीने गुणवत्ताधारक विद्यार्थी व शासकीय योजनांच्या लाभार्थीच्या निधीचे वाटपही करण्यात आले.
फोटो ओळी – आंबडवे येथे आयोजीत जंयत्तीचे कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत सोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम व अन्य.
आंबेडकर जयंत्ती निमीत्त तालुक्यात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुळगाव आंबडवे सह तालुक्यात 13 व 14 एप्रिल 2025 रोजी विविध कार्यक्रम करण्यात आले होते. यात आ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ (रजि.) मुंबई आंबडवे यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे 13 व 14 एप्रिल 2025 रोजी विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले (13) एप्रिल रोजी अपरांन्त साहित्य कला प्रबोधिनीचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजीत करण्यात आले याचबरोबर पहीलीपासून खल्या गटासाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आयोजीत करण्यात आल्या आहेत. (14) एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीतील जाहीर कार्यक्रमासह सकाळी रँली, झेंडावंदन, धम्मवंदना स्वागत समारंभ व रात्री प्रबोधनपर कव्वालीचा कार्यक्रमही आय़ोजीत करण्यात आला आहे. तालुकावासीयांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ (रजि.) मुंबई आंबडवे ग्रामस्थांचेवतीने करण्यात आले आहे.
मंडणगड शहर- बौध्द समाज सेवा संघ तालुका मंडणगड मुंबई व ग्रामिण यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2025 रोजी मंडणगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाईक रँली, धम्मपुजापाठ, मान्यवरांचे स्वागत व मनोगत समारंभ, व्याख्यान, भव्य मिरवणुक, सत्कार समारंभ व जाहीर सभा, व ऑकेस्ट्रा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर दिक्षाभुमी टाकेडे मंडणगड शहरातील शासकीय निमशासकीय कार्यालय बँका पतसंस्था इत्यादी ठिकाणी महामानावस जयत्ती निमीत्तान अभिवादन करण्यात आले.