'रत्नागिरी - सिंधुदुर्ग' शिवसेनेचाच : उदय सामंत

Edited by: भरत केसरकर
Published on: April 03, 2024 09:21 AM
views 1468  views

कुडाळ : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल अशा पद्धतीचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळमध्ये केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये आज शिवसेना आणि भाजपची समन्वय समितीची बैठक होती. मात्र या बैठकीला उदय सामंत हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी नारायण राणे यांची बंद खोलीत काही वेळ चर्चा केली आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून कायम आहे. दरम्यान किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणताही त्रास होऊ नये रात्री उशिरा आपण माघार घेत असल्याचे स्टेटस ठेवलं होत. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्टेटस काढल आहे. अजूनही आमच्या आशा आहे की हा मतदारसंघ निश्चितपणे शिवसेनेकडेच राहील अशा पद्धतीचा दावा सुद्धा उदय सामंत यांनी केला आहे. 


 कोणाची किती ताकद हे वरिष्ठांना माहीत : उदय सामंत

    प्रत्येकाला आणि प्रत्येक पक्षाला लोकसभेच्या जागेवर दावा करण्याचा अधिकार आहे. परंतु एकनाथ शिंदे,अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे कोण निवडून येऊ शकतो आणि कोणाची किती ताकद आहे? हे त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेची सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मोठी ताकद आहे. आणि हा मतदारसंघ शिवसेनेची मोठी ताकद असल्याने हा मतदारसंघ आम्ही दावा केला असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.