सावंतवाडी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आयोजित लोकमान्य ट्रस्ट संचालित देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयामध्ये ५ फेब्रुवारीला उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सकाळी दहा ते पाच या कालावधीमध्ये हा महोत्सव होणार आहे. या कॉलेजला यंदाचे यजमान पद देण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉक्टर बळीराम गायकवाड, समन्वयक डॉक्टर कुणाल जाधव, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, संस्थेचे संचालक सचिन मांजरेकर, पत्रकार अँड. संतोष सावंत, लोकमान्य ट्रस्ट सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर आदी उपस्थित राहणार आहेत. या उडान महोत्सवात सावंतवाडी, दोडामार्ग वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यातून सुमारे १७ महाविद्यालय सहभागी होणार आहेत.
यापूर्वी या कॉलेजमध्ये उडान महोत्सवाच्या आयोजन उत्कृष्टपणे केले होते. त्यामुळे यंदा हा उडान महोत्सव रंगतदार होणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने महाविद्यालयाने सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य यशोधन गवस यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलांना वाव देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून सामाजिक स्तरावर जागृती करण्याच्या दृष्टीने व सांस्कृतिक आदी विविध उपक्रम या महोत्सवात होणार आहेत.