
देवगड : तालुक्यातील धालवली मधील उद्धव ठाकरे सेनेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच राजेंद्र हरियाण, रमेश सरवणकर तसेच गावातील शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष संदेश पटेल, तालुका प्रमुख मंगेश गुरव, पंचायत समिती सदस्य शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.











