फुकाचे श्रेय घेण्यासाठी उबाठा सेनेची धडपड : प्रसन्ना देसाई

वेंगुर्ल्यात मंजूर २२ बीएसएनएल टाॅवरचे भाजपकडून भूमिपूजन
Edited by: दिपेश परब
Published on: December 09, 2023 18:52 PM
views 455  views

वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आज शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी  ११ वाजल्यापासून १३ ठिकाणी भूमिपूजन समारंभ उबाठा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परंतु वेंगुर्ले तालुक्यातील २३ टेलिफोन टाॅवर हे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांच्या प्रयत्नातून मंजूर झाले असल्याने भाजपाच्या त्या त्या ठिकाणच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांकडून , खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन होण्यापूर्वीच भाजपाच्या माध्यमातून भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी देत फुकाचे श्रेय घेण्यासाठी उबाठा सेनेची धडपड असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 

   दरम्यान चिपी येथील बीएसएनएल टॉवर चे भूमिपूजन ग्रामस्थांतर्फे व माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जमीन मालक गुणाजी सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिपी सरपंच माया माडये, उपसरपंच प्रकाश चव्हाण, चिपी ग्रामपंचायत सदस्य, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, साईनाथ माडये, प्रकाश राणे, सुनील चव्हाण, सुधीर पेडणेकर व मोठ्या प्रमाणात चिपी ग्रामस्थ उपस्थित होते.

   वेतोरे मिरमेवाडी येथे मोबाईल टॉवर चे उद्घाटन सरपंच प्राची नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच संतोषी गावडे, माजी उपसभापती स्मिता दामले, माजी चेअरमन विजय नाईक, शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे, ग्रा.पं.सदस्य विनायक गावडे, तुषार नाईक, विक्रम सावंत, साक्षी राऊळ, प्रकाश गावडे, सुजाता वालावलकर, जागा मालक नारायण शेणवी, आपा गावडे, अशोक गावडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

  खानोली गावामध्ये बीएसएनएल टाँवर चा भुमिजन सोहळा संपन्न झाला. यावेळी खानोली सरपंच सुभाष खानोलकर, बाळा सावंत,  वसंत तांडेल , भाजपचे जेष्ठ पदाधिकारी शरद चव्हाण, सुनिल घाग, विष्णु खानोलकर, मनोहर खानोलकर, चंद्रकांत खानोलकर , अण्णा खानोलकर, शामा खानोलकर, शिवाजी रांजणकर, श्री.केळकर, जतिन आवळेगांवकर आदी उपस्थित होते.

       वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील हरिचरणगिरी येथील गणेश मूर्ती कला आकार केंद्र नजिक मंजूर झालेल्या बी एस एन एल टॉवरचे उदघाटन माजी सरपंच शामसुंदर मुणनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई , साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर,  उपसरपंच रवींद्र धोंड , सदस्य अनंत मठकर, महेश मुणनकर , अंनत केळजी , सविता परब, विद्या गोवेकर, राखी धोंड ग्रामस्थ सुरेश करंगुटकर, दीपक करंगुटकर, गोपाळ करंगुटकर, बाळा धोंड, विठ्ठल सातार्डेकर, राजेश घोलेकर आदी उपस्थिती होते.

      अणसुर येथील ग्रामस्थ लवु आत्माराम गावडे, जयराम गावडे , विलास गावडे , नारायण गावडे व गावडे कुटुंबीयांनी टाॅवर साठी मोफत जागा दिल्याबद्दल सरपंच सत्यविजय गावडे यांनी गावाच्या वतीने आभार मानून तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे  , उपसरपंच वैभवी मालवणकर , शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे , बिट्टु गावडे , विजय सरमळकर , प्रभाकर गावडे , सुधाकर गावडे , चंद्रकांत गावडे , रमाकांत गावडे , संभाजी गावडे , बाळा मुळीक , संदेश गावडे , मंगेश गावडे , प्रकाश गावडे  , गोपी गावडे , बाळकृष्ण गावडे , शैलेश गावडे , सचिन गावडे, भुषण गावडे, रवींद्र गावडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते  .