राजापूर कुंभवडेतील उबाठाचे कार्यकर्ते शिंदे सेनेत

Edited by: मनोज पवार
Published on: November 03, 2024 18:43 PM
views 174  views

राजापूर : तालुक्यातील कुंभवडे बानेवाडीतील ग्रामस्थानी गावाचा रथ पुढे नेण्यासाठी येथील उबाठा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उबाठा पक्षाला राम राम करत किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी गावातील विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी आम्ही किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी किरण सामंत यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले, तुमच्या विकासाची जबाबदारी आता माझी आहे, राजापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील शैक्षणिक, आरोग्य,  आणि विकासात्मक दृष्टिकोनातून भविष्याचा काळामध्ये मी या परिसरामध्ये काम करणार माझी लढाई कोणाच्या वैयक्तिक विरोधात नसून विकासाच्या बाजूने आहे गेल्या पंधरा वर्षांमध्ये या विधानसभा मतदारसंघात काय झालं यावर चर्चा सुद्धा करणार नाही मात्र येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये तुमच्यासाठी काय करेल यावर मी लक्ष केंद्रित करतोय आणि म्हणून मुख्यमंत्री योजना आहे.

त्या योजनेचे महिलांना ३५% पर्यंत अनुदान मिळतं ओपन मध्ये 35 टक्के पर्यंत अनुदान मिळतं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण अजून पर्यंत पोहोचलेलो नव्हत्या हे आपल्या पर्यंत पोहोचून त्याचा प्रत्येक तळागाळापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत लाभ मिळवून देण्याचा देखील आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की महिला सक्षमीकरण असेल, ह्या गोष्टीवर देखील आपण भर देणार ज्याप्रमाणे आरोग्य ,शिक्षण, यावरती भर देण्यात बेरोजगारीवर भर देणार त्याप्रमाणे महिला सक्षम सक्षम होण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात आपण भर देणार आहोत. एकंदरीत आपण पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवीत आहोत मला आपल्याकडून एकच विनंती करायची आणि मला खात्री देखील आहे की येत्या 20 तारीख ला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वेळेमध्ये मतदान करायचे तर आपला बहुमूल्य मत जे आहे हे धनुष्य माझं नाव किरण सामंत एक नंबरला आहे धनुष्यबाण ही माझी निशाणी तर आपल्याला मी विनंती करतो की एक नंबर निशाणी किरण सामंत धनुष्यबाण चिन्हावरती आपण बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या अशी विनंती यावेळेस किरण सामंत यांनी उपस्थित.

यावेळी कुंभवडे बाणेवाडीतील योगेश तांबे, प्रकाश पुजारी ,सुनील तांबे ,सुंदर कुडाळकर, विलास गुरव ,दिनेश मुंडे, बाळकृष्ण तांबे ,नितीन नवले, सुभाष गुरव, शांताराम भोंडे ,दीपक आदम, रवींद्र तांबे ,संजय बाने ,धोंडू तांबे, महेंद्र तांबे यांच्या सहित वाढीतील प्रमुख मान्यवरांनी किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळेस तालुकाप्रमुख दीपक नागले, जिल्हा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, विभाग प्रमुख प्रशांत गावकर, महिला विभाग प्रमुख जानवी गावकर सुवास कुवरे यांच्या सही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.