
सावंतवाडी : उभागुंडा येथील रहिवाशांना नगरपरिषद कचरा डेपोमुळे त्रास होणार नाही असं आश्वासन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिल्यानंतर व तशी कार्यवाही केल्यानंतर उभागुंडावाडी रहिवासी विकास एकता संघाचं उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे यांनी दिली.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा डेपोची दुर्गंधी व धूर याबाबत होत असलेल्या आरोग्याच्या समस्येबाबत उभागुंडावाडी रहिवासी विकास एकता संघ चराठे यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर नगरपरिषदेत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चाही झाली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गौरी सागर गावडे, माजी सदस्य ग्रामपंचायत चराठे अँथोनी डिसोजा, उभागुंडा रहिवासी एकता संघ चराठे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थितीत होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात येवून ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता नगरपरिषद घेईल असं आश्वासन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिल. यामुळे उभागुंडावाडी रहिवासी विकास एकता संघाने आपलं उपोषण तुर्त स्थगित केले आहे.