उभादांडा गाव हा पर्यटनाच्या नकाशावर झळकेल : दीपक केसरकर

विकासाठी दीपक केसरकर यांचा नेहमीच ऋणी : कर्मीस आल्मेडा
Edited by: दिपेश परब
Published on: May 02, 2024 12:04 PM
views 300  views

वेंगुर्ले : उभादांडा गावात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं कवितांच गाव म्हणून स्मारक होत आहे. हे पाहण्यासाठी आगामी काळात अनेक पर्यटक याठिकाणी येतील. याशिवाय इथल्या या गावातील अनेक विकासकामांसाठी, रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे. मच्छिमार बांधवांसाठी सिंधूरत्न मधून अनेक योजना देण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी काळात उभादांडा गाव पर्यटनाच्या नकाशावर झळकेल. असे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी उभादांडा येथे केले.  यावेळी याठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रमुख कार्मीस आल्मेडा यांनी उपस्थित राहत केसरकर यांनी याठिकाणचा चर्च असेल किंवा अन्य विकासकामांसाठी भरगोस निधी दिला आहे त्यामुळे त्यांचे विकासासाठी त्यांचा मी कायमच ऋणी राहीन असे यावेळी त्यांनी सांगितले. 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची कॉर्नर सभा आज गुरुवार २ मे रोजी सर्वप्रथम नवाबाग येथील दादा केळुसकर यांच्या घरी व नंतर उभादांडा येथील मानवेल फर्नांडिस यांच्या घरी संपन्न झाली यावेळी केसरकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले, कोकणी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो कधी स्वतःचा स्वाभिमान विकत नाही. कोकणची अस्मिता जपण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्री म्हणून पाठवणे हा तुमचा बहुमान असेल. म्हणून नारायण राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही केसरकर यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मनवेल फर्नांडिस, उभादांडा उपसरपंच सौ आल्मेडा, भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, युवमोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, परबवाडा उपसरपंच पप्पू परब, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, गणपत केळुसकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना पदाधिकारी सौरभ परब आदी उपस्थित होते.