
वैभववाडी : उबाठा गटाचे सोनाळी सरपंच भीमराव भोसले तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. वैभववाडी येथील भाजपा कार्यालयात पक्ष प्रवेश पार पाडला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतोष शेलार, जयवंत पवार, हरिचंद्र गुरव, सचिन कदम, प्रशांत कदम, राजेंद्र जाधव, सचिन भोसले, सुधीर जाधव व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी वैभववाडी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.