उबाठा सेनेच्या मेघा सरवणकर यांचा भाजप प्रवेश..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 07, 2023 13:48 PM
views 881  views

देवगड : भाजपाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवले. या पाठोपाठ वानिवडे ग्रामपंचायत वॉर्ड न. ३ मधील शिवसेना उबाठा सदस्या मेघा मंगेश सरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे देवगड तालुक्यामध्ये उबाठा सेनेला चांगलाच दणका बसला आहे. या निवडणुकीत भाजपाने उबाठाला पूर्ण धोबीपछाड दिली असतानाच हे सदस्य गेल्याने उबाठा सेनेला याचा मोठा फटाका बसला दिसून येत आहे.

आ.  नितेश राणे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याने आपण हा प्रवेश केला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. माझ्या भागाच्या तसेच ग्रामपंचायतच्या विकासासाठी आमदार नितेश राणे हेच योग्य नेतृत्व आहे. असे हि त्यांनी त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर, व्ही. सी. खडपकर, रमेश सरवणकर व अन्य उपस्थित होते.