मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष : आमदार निलेश राणे

उबाठा गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 14, 2025 21:16 PM
views 343  views

मालवण : मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष ठेवून शिवसेना कार्यरत राहणार आहे. खासदार नारायण राणे यांचे विशेष लक्ष नेहमीच मालवण शहरावर राहिले आहे. आगामी काळातही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठा विकासनिधी प्राप्त करून प्रत्येकाला हेवा वाटेल असे 21 व्या शतकातील आदर्श मालवण शहर बनवणार. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. 

मालवण शहर प्रभाग दहा व प्रभाग सात तसेच शहर परीसरातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श असे मालवण शहर बनवण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाने मालवण नगरपरिषदवर भगवा फडकणारच. सर्वांनी एकसंघ काम करूया. जनतेची सेवा करण्यासाठी सेवक म्हणून काम करा. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोठया प्रमाणात निधी येणार शहराचा गतिमान विकास होणार. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, मोहन वराडकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, जिल्हाप्रवक्ते राजा गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावडे, संपर्क प्रमुख राजेश गांवकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, शहर संघटक राजू बिडये, सहदेव बापार्डेकर, राजन परुळेकर, शेखर गाड, युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, महिला तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, अल्पसंख्यांक शहर प्रमुख मार्टिना फर्नांडिस, निकीत वराडकर, हेमंत चव्हाण, भाऊ मोरजे, संदेश चव्हाण, वसंत गांवकर, संदीप मालंडकर, शिवाजी केळूसकर, मंदार लुडबे, जॉन फर्नांडिस, प्रसाद आडवणकर, नारायण धुरी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

उबाठातील 'या' कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश : वायरी येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात वायरी भुतनाथ ग्रामपंचायतचे सदस्य तेजस लुडबे, भाग्यश्री मयेकर, मकरंद मयेकर, जानव्ही मयेकर, प्राजक्ता मयेकर यांसह वायरी प्रभाग दहा मधील अनेक सहकारी उपस्थित होते. याबरोबर मालवण शहर प्रभाग सात मधील उबाठा कार्यकर्ते नरेश हुले, फारूक मुकादम, योगेश मेस्त्री, यतीन केळूसकर, राजेश वाघ, कल्पेश हुले, निकिता जोशी, निशा हुले, नमिता हुले, ओवी, विशाल आचरेकर, जाबीर खान यांसह अनेक सहकारी उपस्थित होते. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी फारूक मुकादम यांना अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली.