
मालवण : आमदार वैभव नाईक यांनी केलेली उद्घाटने ही एक तर काम पूर्ण झालेली आणि ज्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ज्यांची टेंडर झाली अशा कामांची उद्घाटने केली आहेत. निलेश राणे यांच्याकडे स्वतःजवळ कोणताच निधी नाही. नारायण राणे यांना विकास कामांसाठी पाठपुराव्याचे पत्र देतात अशीच पत्र ग्रामस्थाना दिली.
२५/१५ आणि जिल्हा नियोजनच्या तुरळक निधी शिवाय कोणताही निधी नाही. मालवण नगरपरिषदेला ही गेल्या दोन वर्षात स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकानाही निधी देऊ शकले नाहीत. आचरा सारख्या मोठ्या लोकसंखेच्या ग्रामपंचायतीनाही निधी देण्यात अपयशी ठरले. नारळ फोडूनही देवबाग बंधाऱ्याची सुरवात नाही, तळशील गावही १० कोटीचे निधीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांचं प्रामाणिक काम जनतेला दिसून येत आहे. जनतेच्या आशीर्वादाने आमदार वैभव नाईक हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी म्हटले आहे.