साळशीतील उ.बा.ठा कार्यकर्ते भाजपात...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 12, 2024 06:42 AM
views 199  views

देवगड : देवगड येथील साळशी व तोरसोळे उबाठा सेनेचे कार्यकर्ते जगन्नाथ मिराशी, माजी देवस्थान समिती चेअरमन, शांताराम पा. मिराशी, विकास सोसायटी सदस्य,अनिल विष्णू मिराशी, सतीश अर्जुन कदम, अशोक अनंत सावंत, अनंत शिवराम सावंत यांनी आज शिरगाव येथे संदीप साटम यांच्या वाढदिवस अवचित्य साधून भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार नितेश राणे, संतोष किंजवडेकर,अमित साटम, संदीप साटम आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.