
दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत दुचाकी व डंपर यांच्यात अपघात होऊन दुचाकी स्वार सुरेश सावंत, वय 80, रा. दोडामार्ग सोलदेवाडी हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश सावंत हे गोवा मार्गावरून आयीमार्गे आपल्या घरी जात होते. आयी मार्गे गोव्याला खडी भरलेला डंपर जात असताना डंपरच्या मागच्या चाकाला सुरेश सावंत यांचा पाया चिरडला. त्यांच्या पायला गंभीर दुखापत झाली. यावेळी घटनास्थळी उपस्थित कोकणसाद LIVEचे पत्रकार लवू परब, मिलिंद नाईक, बाबूराव धुरी, रितेश शिरोडकर, दादा करमळकर, सुदेश मळीक, प्रदीप गावडे आदी ग्रामस्थांनी मदत कार्य करून रुग्णवाहिका बोलवून सावंत यांना रुग्णवाहिकेत घालून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले. यावेळी अपघातस्थळी दोडामार्ग पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात नेली.