
देवगड : मोर्वे येथे दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी केली चोरी केली आहे. यामध्ये एका घरातील रोख 20 हजार रूपये रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तर दुसऱ्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 7 जुलेै सायंकाळी 7 वाजता ते 8 जुलै सकाळी 9 वा.या कालावधीत घडली आहे.
पोलिसांन कडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे हिंदळे मोर्वे ओवळेश्वर वाडी येथील अविनाश काशीराम हिंदळेकर(54) आणि शारदा शरद शिरवडकर यांच्या बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केली. अविनाश हिंदळेकर हे नोकरी निमित्त मुंबई गोरेगाव येथे वास्तवास असल्याने त्यांचे गावातील घर बंद असते. मात्र त्यांचा घराच्या परिसरातील साफसफाईचे काम त्यांची भावजय सुप्रिया संतोष हिंदळेकर ही करते. हिंदळेकर यांच्या घराशेजारीच राहत असलेल्या नम्रता सुशांत बापर्डेकर यांनी सुप्रिया यांना तेथिलच शारदा शरद शिरवडकर यांच्या घरी चोरी झालेली आहे. त्यामुळे अविनाश हिंदळेकर यांचे बंद घरही तु चेक कर असे सांगीतले. यावेळी सुप्रिया हिंदळेकर यांनी प्रत्यक्ष घराकडे जावून पाहिले असता अविनाश हिंदळेकर यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप कुठल्यातरी हत्याराने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत घरमालक अविनाश हिंदळेकर यांना फोनवरून कळविले. हिंदळेकर हे मुंबईहून गावी मोर्वे येथे आले आणि त्यांनी देवगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील 20 हजार रूपये रोख रक्कम चोरून नेल्याची तसेच घराशेजारीच असलेल्या शारदा शरद शिरवडकर यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भारतीय न्याय संहिता 305,331(3), 331(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरिक्षक महेश देसाई हे या घटनेचाअधिक तपास सुरू आहे.