देवगड ST STAND च्या नूतनीकरणासाठी दोन कोटींचा निधी | नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 28, 2023 14:14 PM
views 602  views

देवगड : आमदार नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर देवगड ST स्टॅन्ड नूतनीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. देवगड एसटी बस स्थानकाची पूर्णतः दुरावस्था झाली असून, आमदार नितेश राणे यांनी सतत यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला होता. बऱ्याचशा गळत्या इमारती व खराब झालेली स्वच्छतागृहे तसेच सांडपाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देऊन ही वस्तुस्थिती नजरेला आणून दिली होती. त्यांच्या आदेशानुसार एस्टी बस स्थानक नुतनीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मंजूरी मिळाली आहे.