सिंधुमित्र प्रतिष्ठानकडून कारागृह वर्ग २ ला TV सेट..!

Edited by: विनायाक गावस
Published on: August 12, 2023 11:36 AM
views 241  views

सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ ला दूरचित्रवाणी (टिव्ही) संच देण्यात आला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याने  दुसऱ्यांदा या कारागृहाला टिव्ही देण्यात आला.

सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू - भगिनींसाठी राबविले आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही देण्यासह सुमारे अडीज वर्षे प्रत्येक मंगळवारी प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच व्याख्याने आयोजनासह महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप, आवश्यक साहित्य वाटप, योग दिन, तीन वेळा आरोग्य शिबीर आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात सुमारे ४ महिने प्रत्येक रविवारी बंदिवान बंधुकरिता प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कारागृह अधिक्षक संदीप एकशिंगे, तुरुंगाधिकारी ब्रह्मदेव लटपटे, सुभेदार सतिश मांडे, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे, भार्गवराम शिरोडकर, डॉ चेतन परब, अँड्र्यू फर्नांडिस, प्रशांत कवठणकर, दीपक गावकर, डॅनिअल फर्नांडिस आदी उपस्थित होते. यावेळी कारागृहाला टिव्ही दिल्याबद्दल कारागृह अधिक्षक संदीप एकशिंगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.