मठ इथं 'सुरंगी रोपवन लागवड' शुभारंभ

जागतिक पर्यावरण दिनाचंनिमित्त
Edited by: दिपेश परब
Published on: June 05, 2025 20:14 PM
views 55  views

वेंगुर्ले : जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यावर लक्ष केंद्रित करून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिवस जगभरात आज साजरा होत आहे. पर्यावरणीय कृती, शाश्वत उत्पादन आणि वापर, समुद्र आणि महासागरांचे संरक्षण आणि परिसंस्था दुरुस्त करणे आणि जैवविविधता टिकवून ठेवणे यासह शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्तता करणे हे एक महत्त्वाचे योगदान आहे .

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य  साधून आज कुडाळ वनपरिक्षेत्रातील मठ वनपरिमंडळ मध्ये वन कक्ष क्रमांक १३६ मध्ये “ सुरंगी रोपवन लागवडा शुभारंभ” करणेत आला. यावेळी सावंतवाडी वनविभागाचे उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, मठ सरपंच रुपाली नाईक, खर्डेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापक धनश्री पाटील यांच्या हस्ते सुरंगी रोप लागवड करण्यात आली. यावेळी सावंतवाडी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सुर्यकांत सावंत, वनपरिक्षेत्र कुडाळ मधील सर्व वनपाल,वनरक्षक,व वनमजूर, स्टाफ यांनी सुरंगी रोप लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदविला. तसेच सदर कार्यक्रमास संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी सुरंगी झाडाचे पर्यावरणीय महत्व विषद करून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे आवाहन केले.