क्षयरोग रुग्णांना सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याची वाडी यांनी घेतले दत्तक

डॉक्टर धर्माधिकारी यांनी केले संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक.रुग्णांनी देखील मानले आभार
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 08, 2023 13:46 PM
views 339  views

कणकवली : श्री श्री 108 महंत मठाधीश गावडे काका महाराज व सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याची वाडी यांच्या वतीने  गावडे काका महाराज यांचा 31 मार्च रोजी वाढदिवसानिमित्त क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने आज कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात क्षयरोग 10 रुग्णांना पुढील सहा महिन्यासाठी दत्तक घेतले आहे. यांना त्यामध्ये त्यांना दर महिन्याला पौष्टिक आहार किट देण्यात येणार आहे. याची सुरुवात आज शुक्रवारी  करण्यात आली. कणकवली उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे या क्षयरोग रुग्णांना जीवनावश्यक पौष्टिक आहाराचा कीट कणकवली वैद्यकीय अधीक्षक  नागनाथ धर्माधिकारी यांच्या हस्ते शनिवार देण्यात आले. सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याची वाडी संस्थेच्या  विश्वस्त  अंजली विजय पावसकर तसेच डॉ हर्षद पटेल,  योगेश ताम्हाणेकर, विजय पावसकर,कणकवली संस्थेचे अध्यक्ष गौरव मुंज,रुपेश  जाधव, दीपिका मोजकर,आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे ,वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षण संभाजी नांदगावकर, अशोक नारकर उपस्थित होते.

शासनाच्या निश्चयमित्र  योजनेअंतर्गत सध्या शासनाने क्षयरोग मुक्तीची जनजागृती अभियान शासन राबवतच आहे. आज क्षयरोग रुग्णांना प्रोटीन कार्बोहायड्रेट अशा पद्धतीचे पोषक आहारातून प्रोटीन घटक यांची आवश्यकता आहे. त्यामुळे श्री श्री 108 महंत मठाधीश गावडे काका महाराज व

सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याची वाडी यांच्या वतीने कणकवलीतील दहा क्षयरोग रुग्णांना दत्तक घेतल आहे. सद्गुरु भक्त सेवा न्यास यांच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक व समाज हिताचे उपक्रम राबवले जातात त्यांनी आज या क्षयरोग व्यक्तींना जो पौष्टिक आहार देऊन  मोलाचे कार्य केले आहे. या रुग्णांना क्षयरोग मुक्त होण्यासाठी याची मदत होणार आहे. त्यामुळे त्यांच्या या संस्थेला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा अशीच त्यांनी समाज उपयोगी कामे करत राहावे असे डॉक्टर नागनाथ धर्माधिकारी यांनी सांगितले.

संस्थेच्या वतीने योगेश ताम्हाणेकर यांनी  संस्थेच्या  वतीने आपण विविध शैक्षणिक सामाजिक आणि समाज हिताचे उपक्रम राबवत असतो व सद्गुरु गावडे काका यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व करतो अशाच पद्धतीने पुढील देखील आपण आमच्या संस्थेच्या वतीने समाज हिताची कामे करणार असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.