रिफायनरी - अदानिंच्या प्रकल्पांप्रमाणे महामार्गासाठी प्रयत्न करा : कुणाल किनळेकर

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 05, 2024 12:09 PM
views 472  views

कुडाळ : ज्याप्रमाणे आपण राज्य सरकार मार्फत विनाशकारी रिफायनरी प्रकल्प त्याचप्रमाणे सिंधुदुर्गच्या जनतेला अंधारात ठेवून माणगाव खोऱ्यातील अदानी प्रकल्प यांना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करता त्याचप्रमाणे, रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नाही तर तो कोकणी जनतेच्या विकासात अडसर ठरतोय म्हणून मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की, वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रश्न मनसेने रस्त्यावर उतरून आवाज उठवल्यानंतर ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने पालकमंत्री तथा राज्य सरकारचे महत्त्वाचे मंत्री म्हणून स्वतः लक्ष घालत रस्त्यावर उतरून ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी मुंबई गोवा महामार्ग काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तसेच कोकणी जनतेसाठी रस्त्यावर उतरून मनसे स्टाईल आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना स्वतः पत्र लिहून मनसे स्टाईल आंदोलन न करण्याचे आवाहन केले.

तेव्हा वाटले होते की खरंच मुंबई गोवा महामार्गाचे काम खरंच 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण होईल व  पहिल्या मोठ्या गणेश उत्सवाला चाकरमान्यांना ज्या प्रकारे खड्ड्यातून यावे लागले त्यात सुधारणा होऊन आत्ता होळी उत्सवाला तरी काम पूर्ण झालेल्या खड्डेविरहित मुंबई गोवा महामार्गाने सुरळीत प्रवास करता येईल पण दुर्दैवाने पुन्हा एकदा रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे तोच खड्डेमय प्रवास कोकणी जनतेच्या नशिबी केले कित्येक वर्ष येणार आहे. तरी ज्या पद्धतीने रिफायनरी, व कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील अदानीच्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीने पराकाष्टा करत आहात, त्याच पद्धतीने मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.