निवडणूक घेऊन नोंदणीकृत ट्रस्ट - बदल अहवाल सादर करण्याच्या सूचना : अण्णा केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: June 23, 2023 11:04 AM
views 88  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनची कार्यकारणी कोल्हापूरच्या सहधर्मदाय आयुक्त यांच्या आदेशानुसार बरखास्त झाली आहे. तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या देखरेखीखाली वैद्य सदस्यांकडून निवडणूक घेऊन नोंदणीकृत ट्रस्ट आणि बदल अहवाल सादर करण्याच्या सूचना धर्मदाय सहआयुक्त कोल्हापूर यांनी दिले आहेत. यासंदर्भात वसंत केसरकर यांनी सह धर्मदाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. त्याचा निर्णय २५ मे रोजी सहधर्मादाय आयुक्त श्रीमती एन एस पवार यांनी दिला असे वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी सांगितले.


सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन ही नोंदणी कृत संस्था आहे या संस्थेची स्थापना १९८३ साली झाली कार्यकारी मंडळात अध्यक्ष उपाध्यक्ष एक कार्याध्यक्ष एक कार्य व दोन सहकार्यवाह एक खजिनदार सहा सभासद अशी रचना आहे. वसंत केसरकर हे संस्थेचे आजीव सभासद होते केसरकर आजीव सभासद असताना त्यांना सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या संचालक मंडळाने मयत दाखवले .तसेच २०१६ ते २०२० या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक दाखवून धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्याकडे चेंज अहवाल सादर केला. धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांनी कार्यकारी मंडळाची निवड घटनेतील तरतुदीप्रमाणे न झाल्याचे नमूद करून चौकशी न करता चेंज रिपोर्ट मंजूर केला. दरम्यान आजीव सभासद असताना आपल्याला मयत दाखवल्याचे कळताच केसरकर यांनी यासंदर्भात आवाज उठवला. संबंधिताविरोधात पोलिसात तक्रारही दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात केसरकर यांनी धर्मदाय सहआयुक्त कोल्हापूर यांच्याकडे रिव्हिजन अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी खालील कोर्टाने मंजूर केलेला आदेश रद्दबातल करण्याची मागणी केली. तसेच संस्थेच्या नियमावलीतील तरतूद क्रमांक १९ नुसार कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड ३१ मार्च पूर्वी करणे गरजेचे आहे. तथापि सदर प्रमाणे कार्यकारी मंडळ अगर पदाधिकारी निवड झालेले नाही . वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आपल्याला मिळणे आवश्यक होते. परंतु हेतूपुरस्करपणे सभासद यादीतील नावासमोर निधन अशी नोंद करून सभासदत्व रद्द केले हे कृत्य घटना बाह्य आहे संस्थेच्या नियमातील तरतुदीनुसार कार्यकारी मंडळातील १५ सदस्यांपैकी प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे आठ सदस्य तालुका कबड्डी असोसिएशन प्रतिनिधी निवड करण्याची गरज आहे.


याकरता तालुका कबड्डी असोसिएशन या संस्थांचे बदल अर्ज मंजूर करणे आवश्यक आहे. त्यामधून प्रतिनिधींनी ससंस्थेकडे येणे आवश्यक आहे. याबाबत खालील कोर्टाने कागदपत्राची पाहणी केलेली नाही पदाधिकारी निवड होणे बंधनकारक आहे. तथापि पदाधिकारी निवड झालेली नाही. सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस लागू करणे गरजेचे होते . परंतु सभेची नोटीस लागू करण्यात आलेले नाही . कार्यकारी मंडळाची निवड चुकीची व बेकायदेशीर असताना खालील कोर्टाने बदल अर्ज मंजूर करण्याची कृती चुकीची व बेकायदेशीर आहे असे केसरकर यांनी आपल्या रिविजन अर्जात नमूद करून दाद मागितली होती. त्याचा निर्णय २५ मे रोजी लागला त्यानुसार चेंज रिपोर्ट ३३५ / २०१८ संदर्भात देण्यात आलेला आदेश बाजूला ठेवण्यात आला तसेच आदेशापासून तीन महिन्याच्या आत अद्यावत सभासद यादी तयार करण्याचे आदेश जनरल बॉडीला देण्यात आले आहेत तसेच धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या देखरेखीखाली वैध सदस्यांकडून निवडणूक घेऊन निवडणूक तर चेंज अहवाल दाखल करावा असे निर्देश धर्मदाय आयुक्त कोल्हापूर यांनी दिल्याचे वसंत केसरकर, प्रसाद आरविंदेकर, दीनानाथ बांदेकर यांनी सांगितले.