
सावंतवाडी : सावंतवाडी येथील कोलगावात सिमेंट फॅक्टरीच्या समोर ट्रक पलटी झाला. हा ट्रक पार्सल घेऊन कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने येत होता. चालकाला डुलकी लागली, ट्रक वरील नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक पलटी झाला. हा अपघात घडला त्यावेळी ट्रकचा वेगही जास्त होता, अशी माहिती मिळतेय. सुदैवाने ट्रक चालक सुखरूप असून ट्रकमधील सामानाचंही नुकसान झालं नाही.