कणकवलीत गोवा बनावटीच्या दारूचा ट्रक पलटी..!

Edited by:
Published on: November 02, 2023 10:58 AM
views 3686  views

कणकवली : तालुक्यातील खारेपाटण रोडवर नडगिवे घाटामध्ये गोव्यावरून मुंबईच्या दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. हा अपघात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला असून. त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण ड्रायव्हर व किन्नर यांनी तेथून पलायन केल्याचे समजत आहे.

हा अपघात एवढा भीषण होता ट्रक डिव्हायडर वर चढून गाडी दुसऱ्या लेंथ वर जाऊन पलटी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी नाव घेतली. पण संपूर्ण रस्त्यावर दारूचे बॉक्स आणि दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत होत्या. त्यामुळे तळीराम  संधी साधूनची चांदीच झाल्याचे समजत आहे.