
सावंतवाडी: आंबोली-सावंतवाडी राज्यमार्गावर कारीवडे-पेडवेवाडी येथे एक चिरेवाहू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिली. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
चंदगड येथील रहिवासी असलेला समीर सय्यद हा आपल्या ताब्यातील चिऱ्याने भरलेला ट्रक घेऊन चंदगडच्या दिशेने जात होता. कारीवडे-पेडवेवाडी बाजारपेठेत आल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि त्याने नियंत्रण गमावले. या धडकेने तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेमुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली असून दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. ्