त्रिपुरारी पौर्णिमा मंदिरात दीप लावून साजरी करावी!

- माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: November 04, 2022 20:46 PM
views 152  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर, आत्मेश्वर मंदिर, दत्त मंदिर, भटवाडीतील विठ्ठल मंदिर आणि शहरातील अनेक मारुती मंदिर आहे. या मंदिरातील प्रत्येक मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा निमीत्त दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

 काही मंदिरामध्ये पूर्वीपासून त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव होत आहे. शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून यावर्षीपासून प्रत्येक मंदिरामध्ये त्या - त्या भागातील व्यवस्थापनाने दीपोत्सवामध्ये सहभागी व्हावे. यासाठी सर्व मंदिर व्यवस्थापनाला भेटून विनंती करण्यात येणार आहे, असेही साळगावकर यांनी म्हटले आहे.

दीपोत्सवामध्ये पारंपारिक पणत्या लावून  दीपोत्सव करावा अशीही सूचना बबन साळगावकर यांनी केली आहे कुठेही मंदिरामध्ये मेणबत्तीचा वापर करण्यात येऊ नये उत्सव सर्व मंदिरामध्ये साजरा करून मंदिर प्रशासनाने सावंतवाडी शहराची वेगळी ओळख निर्माण करावी. तसेच उत्सवामध्ये महिलांनी मोठा सहभाग दर्शवावा व सावंतवाडी शहरातील या दीपोत्सवासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यासाठी प्रत्येक महिलेने घरातून पाच पणत्या आणून आपल्या नजीकच्या देवळात लावाव्यात, असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.