
सिंधुदुर्गनगरी : ओरोस, जि. सिंधुदुर्ग श्री देव शिवारी प्रासादिक भजन व मित्र मंडळ, ओरोस खर्येवाडी यांच्या वतीने गुरुवर्य काशीराम परब बुवा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता भव्य तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम हॉटेल साईधाम, ओरोस खर्येवाडी (ता. कुडाळ) येथे होणार आहे.
या विशेष भजन स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत तीन बुवांमध्ये तिरंगी सामना रंगणार असून पुढील संघ सहभागी होत आहेत:
बुवा श्री. विजय उर्फ गुंडू सावंत, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे (कुडाळ) बुवा श्री. समीर महाजन, श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ, मुणगे (आडवळवाडी) बुवा श्री. शंकर उर्फ आनंद कानडे, श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घावनळे (खुटवळवाडी)
या तिन्ही बुवांमध्ये होणाऱ्या डबलबारी भजनाच्या तिरंगी स्पर्धेमुळे परिसरातील भजनप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. भक्तिरस, ताल–लय आणि पारंपरिक भजनसंस्कृतीचा अविस्मरणीय मेळ साधणारा हा कार्यक्रम मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून अनुभवावा, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.










