
वेंगुर्ला : दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘’घरोघरी तिरंगा’’ हे अभियान साजरे करण्यात येत आहे. राष्ट्रध्वजास समर्पित राष्ट्रभक्तीच्या भावनेने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत शहरातील लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय व महाविदयालयीन विदयार्थी यांची एकत्रितपणे दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी दाभोली नाका ते बॅ. खर्डेकर महाविदयालय वेंगुर्ला या मार्गावर तिरंगा दौड आयोजित करण्यात आलेली होती. या तिरंगा दौड मध्ये मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर यांच्यासाहित लोकप्रतिनिधी तसेच मोहन होडावडेकर, डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. राजेश्वर उबाळे, डॉ. संजीव लिंगावत, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, बॅं. खर्डेकर महाविदयालयाचे बाळासाहेब गायकवाड, जे.वाय.नाईक, क्रिडा शिक्षक जयराम वायंगणकर, वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, बॅं. खर्डेकर महाविदयालयाचे प्राध्यापक, खेळाडू, NCC, NSS चे विदयार्थी, मदर तेरेसा स्कूलचे शिक्षक व विदयार्थी तसेच शहरातील बहुसंख्य नागरीक सहभागी झाले होते. आपल्या सर्वांना एकत्र बांधणा-या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत तिरंगा दौडचे आयोजन करण्यात आलेले होते.