
सिंधुदुर्ग : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी वेंगुर्ले सोन्सूरे येथील एक वाळू शिल्पकार रवीराज चिपकर यांनी आरवली सागरतीर्थ किनाऱ्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वाळूशिल्प साकारत आगळी - वेगळी मानवंदना दिली आहे.
वाळू शिल्पकार रवीराज चिपकर हे अनेक सामाजिक विषयांवर वाळूशिल्प साकारत असतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वाळूशिल्प त्यांनी अवघ्या तीन तासात साकारले आहे. या साकारलेल्या वाळू शिल्पामध्ये रंगसंगती देत अतिशय मनमोहक असे हे शिल्प सध्या लक्षवेधी ठरत आहे.