तहसीलदार संकेत यमगर यांचा सत्कार..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 16, 2024 13:32 PM
views 482  views

देवगड : देवगड येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी संकेत यमगर यांची उत्कृष्ठ तहसीलदार म्हणून निवड करण्यात आली.याबद्दल त्यांचा विशेष सत्कार शाल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देवून इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स , अंबेसिडर ऑर्गनायझेशन सिंधुदुर्ग जिल्हा व देवगड शाखा यांच्या वतीने करण्यात आला.देवगड चे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संकेत यमगर यांची उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्हाधिकारी यांचेकडून निवड करण्यात आली सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोडामार्ग तहसीलदार म्हणून संकेत यमगर यांनी काम पाहिले या कालावधीत लोकाभिमुख कामकाज करताना कर्मचारी वर्गांच्या देखील समस्या जाणून घेत महसूल विभागाला साजेसे काम केले . याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेत महसूल दिनाचे औचित्य साधून तहसीलदार संकेत यमगर यांची उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड केली केली आहे .

लोकसभा निवडणूक कालावधीत देवगड तहसीलदार संकेत यमगर यांनी पदभार स्वीकारलेला होता देवगडच्या जनतेच्या समस्यांबाबत देखील यापूर्वी त्यांनी कार्यक्षमता दाखविली व सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे .यावेळी माजी आमदार अजित गोगटे गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, मुख्याधिकारी सुरजकांबळे,पोलीस निरीक्षक अरुण देवकर,तसेच संस्थेचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष दयानंद तेली, जिल्हा महिला सचिव सौ दीक्षा तेली, मीडिया जिल्हाध्यक्ष दयानंद मांगले, देवगड तालुका अध्यक्ष शाम कदम ,उपाध्यक्ष विलास रुमडे,महिला तालुकाध्यक्ष सौ शामल जोशी पी आरओ रवीकांत चांदोस्कर अपंग सेना संघटना अध्यक्ष प्रकाश जाधव, सदस्य नंदकिशोर परब आदी उपस्थित होते.