राजनभाईंच्या आठवणीनं पाणावले डोळे !

जनतेशी बांधिलकी असणारा सामाजिक कार्यकर्ता गेला : नारायण राणे
Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2024 14:23 PM
views 312  views

▪️ सावंतवाडीतील शोकसभेत वाहीली आदरांजली 

सावंतवाडी : राजन आंगणे यांच निधन झालं ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्यानं एक चांगला उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता हरपला. गोरगरीबांसाठी धावून जाणारा, जनतेशी बांधिलकी असणारा सामाजिक कार्यकर्ता गेला याच दुःख आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व आंगणे कुटुंबियांना हे दुःख पचविण्याची ताकद रामेश्वर देवो अशा भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त करत आदरांजली अर्पण केली. सावंतवाडी येथील आयोजित शोकसभेत ऑनलाईन प्राणालीच्या माध्यमातून उपस्थित राहत मंत्री नारायण राणेंनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राजन आंगणेंच्या स्मृतींनी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.


हेल्पलाईन फाउंडेशन व हेल्पलाईन मित्रमंडळ सावंतवाडीच्या माध्यमातून उद्योजक स्व.राजन आंगणे यांच्या श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजन आंगणेंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आल्यानंतर उपस्थितांना अश्रू अनावर झाले. श्रीराम वाचन मंदीर समोरील कट्यार या शोकसभेच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना स्व.राजन आंगणेंप्रती आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली अर्पण केली. तर रोज सायंकाळी ज्या कट्ट्यार त्यांचा सहवास असायचा त्या कट्ट्याला स्व.राजन आंगणेंच नाव देण्यात यावं अशी मागणी मान्यवरांनी केली. 

या शोकसभेस याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नेते विकास सावंत, सी.एल.नाईक, हेल्पलाईन उपाध्यक्ष शिवशंकर उर्फ बंड्या नेरूरकर, निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, संतोष कदम, दीपक पाटकर, विजय चव्हाण,माजी नगरसेविका शुभांगी सुकी, माया चिटणीस, डॉ. राजेश गुप्ता, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, पुंडलिक दळवी, अँड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, समीर वंजारी, अतुल पेंढारकर, महेश कुमठेकर, रेखा कुमठेकर, तुषार वेंगुर्लेकर, बाळा बोर्डेकर, निशांत तोरसकर, रविंद्र मडगावकर, महेश सुकी, केतन आजगावकर, वल्लभ नेवगी, रामदास पारकर, सुधीर धुमे, सुधीर पराडकर, दत्ता सावंत, राजेश पनवेलकर, जितेंद्र पंडीत, अरूण भिसे, रविकिरण तोरसकर, चेतन नेगवी, ज्योती तोरसकर, गुरू मठकर, राजन म्हापसेकर, रितेश हावळ, साई हवालदार, सतीश बागवे, अजय गोंदावळे, अँड. संजू शिरोडकर, बाळ चोणकर, भाई देऊलकर, नासिर शेख, संतोष गांवस, मकरंद कशाळीकर, दीपक म्हापसेकर, बाबली गवंडे, अँड. अनिल निरवडेकर,  डी.डी.देसाई,सत्यवान बांदेकर, परशुराम गावडे आदिंसह मोठ्या संख्येने राजनभाई आंगणेप्रेमी उपस्थित होते.