कळसुली शक्तिकेंद्रप्रमुख श्यामसुंदर दळवी यांना भाजपकडून श्रद्धांजली

Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 22, 2025 14:18 PM
views 73  views

कणकवली :  कळसुली शक्तिकेंद्रप्रमुख दिवंगत शामसुंदर दळवी यांना कणकवली तालुका भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. शामसुंदर दळवी यांचे २० जून रोजी कणकवली येथे झालेल्या अपघातात निधन झाले. शामसुंदर दळवी हे कळसुली पंचक्रोशीतील परिसरात भाजपा पक्षाच्या संघटन वाढीसाठी हिरीरीने काम करत होते. दळवी यांच्या निधनाने पक्षाची हानी झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दळवी यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली. 

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, तालुका चिटणीस समीर प्रभुगावकर, सुभाष मालंडकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, निसार शेख, समीर ठाकूर,सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.