अनिल भाई परूळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली

Edited by: विनायक गावस
Published on: March 02, 2024 12:29 PM
views 50  views

सावंतवाडी : शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक कै. अनिल भाई परूळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हाॅस्पिटलमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर,माजी नगरसेवक उमेश कोरगांवकर,माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्रीराम वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर,कळसुलकर शाळेचे संस्था सदस्य दत्तप्रसाद गोठसकर,असनीये येथील सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्ते संदीप सावंत, सामाजिक बांधिलकी संस्थेचे रवि जाधव असे अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर,उमेश कोरगांवकर, संजय पेडणेकर यांनी अनिल परूळेकर यांच्या ऐंशीच्या दशकातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या कार्याबद्दल सांगितले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रसाद पावसकर, दत्तप्रसाद गोठसकर तसेच सामाजिक बांधिलकी संस्थेचे रवि जाधव यांनी अनिल भाईंच्या वयोवृद्ध झाल्यावर देखील सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या उत्साहाबद्दल आणि योगदानाबद्दल सांगितले.याप्रसंगी आठ गरजू लाभार्थ्यांना सामंत ट्रस्ट तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बांदा येथील अजित बांदेकर,दिव्यांग असलेले कृष्णा मेस्त्री, कर्करोग पिडित विष्णू केळूसकर,निरवडे येथील आपा जाधव, माडखोल येथील विजया राऊळ, असनीये येथील उमाजी असणकर,कास येथील कृष्णा कासकर आणि शैक्षणिक मदतीसाठी शेडगे अशा आठ जणांना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.