राजन आंगणेंची उद्या सावंतवाडीत श्रध्दांजली सभा...!

Edited by: विनायक गावस
Published on: March 26, 2024 07:27 AM
views 133  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दानशूर उद्योजक, सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते, जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने गेली पस्तीस वर्षाहून जास्त काळ आपलं भरीव योगदान देणारे स्व. राजन आंगणे यांचे दिनांक १८ मार्च रोजी अकाली दुःखद निधन झाले. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, तीन मुखी दंतमदिर देवस्थान समिती, लायन क्लब, रोटरी क्लब, सावंतवाडी हेल्पलाईन फाऊंडेशन अशा विविध संस्थाच्या माध्यमातून त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. राजन आंगणे यांच्या शोकाकुल मिञ परिवाराच्या वतीने बुधवार दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्रीराम वाचन मंदिराच्या समोरील मोती तलावाच्या काठावर श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आलेले असून या श्रद्धांजली सभेसाठी राजन आंगणे यांच्या मिञ परिवाराने उपस्थित रहावे असे आवाहन स्व. राजन आंगणे मिञ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.