रक्तदान करून श्रद्धांजली...!

Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2024 05:39 AM
views 140  views

सावंतवाडी : स्व. बाळभाई बांदेकर यांनी सावंतवाडी शहरातील सार्वजनिक क्षेत्रात बहुमोल योगदान दिले होते. रक्तदान शिबीर व पोलीओ डोस बाबतीत त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून कार्य केले. आज रक्तदान करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

स्व. बाळभाई बांदेकर यांनी ते रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे संस्थापक सदस्य असताना त्यावेळच्या कठीण परिस्थितीत पोलिओ डोस व गरजुना रक्त उपलब्ध करून देत रक्तदान शिबीर अशा अनेक मोहीम राबविल्या. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त आठवण म्हणून रोटरी क्लब, सावंतवाडी रक्तदान शिबीर आयोजित करते.याप्रसंगी स्व. बाळभाई बांदेकर यांचा पुतण्या डी जी बांदेकर ट्रस्ट चे अध्यक्ष बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट चे कार्यकारिणी सदस्य गोविंद उर्फ केदार बांदेकर यांनी व कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान करून स्व. बाळभाई बांदेकर यांचा स्मृतिदिनी श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी बी एस बांदेकर कॉलेज प्राचार्य उदय वेले,रश्मी गोविंद बांदेकर, प्राध्यापक वर्ग व विध्यार्थी उपस्थित होते.