वृक्ष लागवड करणे काळाची गरज : गजानन नाईक

Edited by: विनायक गांवस
Published on: August 11, 2024 13:00 PM
views 237  views

सावंतवाडी : जगात होणारा पर्यावरणाचा ऱ्हास पाहता जगभरात कोट्यावधीच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबचे रिजन चेअरमन लायन गजानन नाईक यांनी केले. सावंतवाडी लायन्स क्लबच्या निरवडे येथील वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि रीजन सेक्रेटरी अमेय  पै होते. 

ज्येष्ठ लायन एमजेएफ संतोष चोडणकर ,ला.राजन पोकळे प्रमुख पाहुणे होते . सावंतवाडी लायन्स क्लब तर्फे  निरवडे येथे काजू आंबा, वड, पिंपळ अशी विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. सुमारे २१० रोपे लावून तिचे जतन करून जोपासना करण्याचा निर्णय घेण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमात सेक्रेटरी अँड. अभिजीत पणदुरकर, अँड. परिमल नाईक, बाळासाहेब बोर्डेकर, नाथा कदम सुनीता टक्केकर, स्मिता पै, राजन कुबडे, महेश कोरगावकर, दत्तू नार्वेकर,ला.सुधीर आडिवरेकर,.ला. सोमेश टक्केकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.