
सिंधुदुर्ग : कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातर्फे १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये “वृक्ष लागवड अभियानाची” अंमलबजावणी चालू आहे. मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वा. छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय ओरोसच्या प्राधिकरण प्रक्षेत्रामध्ये वृक्ष लागवड अभियान कार्यक्रम माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत व उप वन संरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच याच दिवशी याच ठिकाणी सकाळी ठिक ११.०० वा. शेतीमध्ये वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव विषयी शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. कृपया सदर कार्यक्रमास आपणास निमंत्रित करण्यात येत आहे.