कृषीदिनी कणकवली पत्रकार संघाच्यावतीने वृक्षारोपण

Edited by:
Published on: July 01, 2025 20:50 PM
views 7  views

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघाचा वृक्षारोपण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकार संघाने फोंडाघाट येथे वृक्ष लागवडीचा उपक्रम घेत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कणकवली तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जोपासणारे काम करीत आहे. पर्यावरणाचा समोतल राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष लागवड करून वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचे काम सर्वांनी करावे. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील वनसंपदेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही वनविभागाची आहे,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले.

महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघ, वनविभाग, फोंडाघाट एज्युकेशन सोसासटी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू. इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. तोरस्कर बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, कणकवली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी चेअरमन राजू पटेल, सचिव श्री. लिग्रज, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे,  वनरक्षक धु. रा. कोळेकर, श्रीकृष्ण परिट, मुख्याध्यापक प्रकाश पारकर, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, जि. प. चे माजी बांधकाम सभापती संदेश सावंत-पटेल, ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण, रमेश जोगळे, नंदू कोरगावकर, महेश सरनाईक, अजित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. 

सुहास पाटील म्हणाले,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्टÑात यंदा १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. कोकणासाठी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट सर्व विभागांतर्फे पूर्ण करण्याचा संकल्प केलेले आहे. कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश आहे. निसर्गाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. महाराष्टÑ राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषीदिनी वृक्षारोपण करण्याचा कणकवली तालुका पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील वनसंपदा वाढावी, यासाठी वनविभागामार्फत आगामी काळात वन विषयक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. कणकवली विभागात वनसंपदा वाढावी यासाठी वनविभागातर्फे वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राजू पटेल म्हणाले, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती  व कृषी दिनी कणकवली तालुका पत्रकार संघाचा वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कणकवली तालुका पत्रकार संघ विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्यांच्या उपक्रमांचे अनुकरण सर्वांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पत्रकार केवळ बातम्या न करता सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजोपयोगी उपक्रम राबवतात,ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. पत्रकार संघाच्या यापुढील काळात कोणत्याही उपक्रमाला फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

गणेश जेठे म्हणाले, कणकवली तालुाक पत्रकार समितीचा वृक्षारोपण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. कोकणातील रायवळ आंबा, जांभूळ यासारख्या फळ पिकांची झाडे लुप्त होत आहेत. या लुप्त होणाºया झाडांची लागवड सर्वांनी केली पाहिजे. कोकणात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या संपदचे संरक्षण करण्याची जाबाबदारी कोकणवासीयांची आहे. 

प्रास्ताविक करताना भगवान लोके म्हणाले, राज्यात व जिल्ह््यात आदर्शवत ठरतील, असे उपक्रम तालुका पत्रकार संघातर्फे राबवले जात आहेत. वनराई बंधारे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, पत्रकारांचे स्नेहसंमेलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यासारखे विविध उपक्रम जातात. कणकवली पत्रकार संघाची एक वेगळी ओळख जिल्ह््यात आहेत. पत्रकारांची एकजुट असल्यामुळे विविध उपक्रम आम्ही यशस्वी करीत आहोत. वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरणाचा रंक्षणाचा संदेश देतानाच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हा उपक्रम घेण्यात आला. आरंभी छत्रपती शिवाजी महाराज व आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मान्यवरांचे स्वागत प्रकाश पारकर यांनी केले. महाराष्टÑ शासनाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश सरनाईक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. जोईल यांनी केले. आभार संजय सावंत यांनी मानले. यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन कदम, उमेश बुचडे, सचिन राणे, सहसचिव दर्शन सावंत, मिलिंद पारकर, तुषार हजारे, संजोग सावंत, विनय सावंत, पप्पू निमणकर, संजय पेटकर, विराज गोसावी, संजय बाणे, प्रथमेश जाधव, तुषार नेवरेकर, गुरुप्रसाद सावंत, उत्तम सावंत, वन विभागाचे जितेंद्र पोरलेरकर, शुभम पाटील, स्वाती वानवडे, रोहित व्हानाळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. 

न्यू इंग्लिश हायस्कूल प्रांगणात वृक्षारोपण 

फोंडाघाट एज्युकेशन सोसासटीच्या न्यू. इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात पर्यावरणाचा संवर्धनाचा संदेश देत कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने कल्पवृक्ष, आंबा, चिकू, पेरू, औषधी वनस्पती व विविध प्रकाराचे वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लागवड केलेली वृक्षांची रोपे जगवण्याचा संकल्प करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांवर वृक्षांची संगोपन करण्यासाठी दत्तक योजना राबविण्याचे ठरले.