
सावर्डे : हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे वृक्ष लागवड व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हरित सेनेचे विद्यार्थी व हॉर्टिकल्चर विभागातील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात केले. पालक व विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्ष वाटप करण्यात आले. एक झाड आईसाठी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना झाडांचे पर्यावरण संवर्धनातील झाडांचे महत्त्व याविषयी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर, सदस्य माजी प्राचार्य अन्वर मोडक सुभाष शेठ मोहिते,ग्रामस्थ रवी शेठ सुर्वे, सुरेश राडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण करून न थांबता वृक्ष संवर्धन करावे यामुळे मृदा संवर्धन होणे सुलभ होईल याची कल्पना देतानाच सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे नियोजन अमित साळवी यांनी दिले. त्याचबरोबर वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी शपथ देऊन जागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन हरित सेना विभागप्रमुख साजिद चिकटे यांनी केले.
पालक व विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करताना ग्रामस्थ विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर,प्राचार्य राजेंद्र वारे व मान्यवर