
वैभववाडी : उपळे गावचे माजी सरपंच तथा उद्योजक देवानंद पालांडे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. "एक पेड मॉ के नाम" या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
श्री पालांडे यांचा ५०वा वाढदिवस नुकताच संपन्न झाला.या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये गावातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच उपळे नं.१शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच शाळेमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी श्री. पालांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यासासोबत निसर्गावरही विद्यार्थ्यांनी प्रेम करावे. आपण लावलेल्या झाडांचे योग्य पद्धतीने संगोपन केले पाहिजे. मेहनत करून चांगले गुण संपादन करून गावचे नाव उज्ज्वल करा असं आवाहन श्री पालांडे यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नारकर यांनी श्री पालांडे यांचा सत्कार केला. यावेळी शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संदिप उपडे व सर्व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण तावडे व आभार सरिता चाटील यांनी मानले.