खासदारांच्या हस्ते वृक्षारोपण

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 14, 2025 17:35 PM
views 227  views

सिंधुदुर्गनगरी :     पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर होणे ही काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, जिल्हा परीषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग संयुक्त वृक्ष लागवड मोहिम राबवित आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने आज खासदार नारायण राणे यांच्या हस्ते गरुड चौक ते जेल रोड रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी देखील वृक्ष लागवड केली. यावेळी विभागीय वन अधिकारी राजेंद्र मगदुम, कृषि विकास अधिकारी दिक्षांत कोळप आदी उपस्थित होते.