
कुडाळ : इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे फळझाडांचे वृक्षारोपण अध्यक्षा सौ सानिका मदने यांचेहस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित करण्यात आली.
यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सानिका मदने, सचिव सई तेली, पीडीसी डाॅ सायली प्रभू, ऋतुजा परब, स्वप्नाली साळगावकर, मनाली नाईक, पालक सदस्य प्रविण वारंग, आदी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत चाफा, पेरू, सुपारी, आंबा, कोकम, फणस आदी वृक्षरोपांचा समावेश होता.