
सावंतवाडी : सावंतवाडी सालईवाडा येथील वस्तीच्या ठिकाणी आग लागली. या आगीत परिसरातील झाड जळू़न खाक झाली. सालईवाडा साटेलकर गिरण समोर ही आग लागली. या आगीच नेमकं कारण कळू शकलं नाही. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली होती. नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबान घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणल्यान मोठा अनर्थ टळला. या आगीत झाड जळून खाक झाली. बंबान पाणी मारल्यावर आग आटोक्यात आली. यावेळी अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पांडुरंग नाटेकर, अर्चित पोकळे, मेहर पडते, देवेश पडते, रमेश जाधव, आसीफ शेख आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला.