कोलगाव नाक्याजवळील झाडाच्या फांद्या रस्त्यावर ; अपघाताची शक्यता

Edited by: विनायक गावस
Published on: August 01, 2023 12:33 PM
views 105  views

सावंतवाडी : कोलगाव नाक्याजवळील झाडाच्या काही फांद्या रस्त्यावरती आल्याने याचा  ये-जा करणाऱ्या पादाचारी तसेच मोटरसायकल चालकांना अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे. गेले कित्येक दिवस ही परिस्थिती अशीच असून याकडे प्रशासनाच पुर्णतः दुर्लक्ष झालं आहे. या ठिकाणी बरेच अपघात झाले असून काहींनी प्राणही गमावले आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली आहे.