तळवडेतील उद्योजक राजाराम आत्माराम गावडे यांना परिवर्तन गौरव पुरस्कार

Edited by: प्रतिनिधी
Published on: November 04, 2022 23:38 PM
views 172  views

वेंगुर्ला : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील म्हाळाई देवी कला क्रिडा मंडळ यांचा या वर्षीचा परिवर्तन गौरव पुरस्कार तळवडे गावातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे संघमालक राजाराम आत्माराम गावडे यांना देण्यात आला.

     हा पुरस्कार युवा उद्योजक तथा हिंद मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे, तळवडे ग्रामपंचायत सदस्य स्नेहल राऊळ, केशव उर्फ दादा परब, सुभाष कोरगावकर, प्रकाश परब, बाळू साळगावकर, बाळू कांडरकर, अनील परब, सुरेश गावडे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरित करण्यात आला. 

   राजाराम गावडे याच्या उद्योजक क्षेत्र सामाजिक तसेच क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येऊन त्यांच्या सामाजिक  कार्याचा गौरव मंडळाकडून करण्यात आला.